Halloween party ideas 2015

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मित्र परीवाराने निर्जंतुकीकरण प्रवेशद्वारांची केली निर्मिती.

खासदार उन्मेष पाटलांच्या हस्ते झाले उद्धघाटन

अमळनेर प्रतिनिधी

येथील राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, पंकजभाऊ चौधरी मित्र परिवार चा वतीने कोरोना महाभयंकर आजारा ला प्रतिबंध करण्याचा हेतूने मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज पंडीत चौधरी यांचा 14 एप्रिल रोजी चा वाढदिवसानिमित्त बाहेरपुरा भागात येणाऱ्या नागरिकांना निर्जंतुकीकरण करून परिसरात प्रवेश करण्यासाठी राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ च्या युवा कार्यकर्त्यांनी निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती केली आहे. सदर प्रवेशद्वार चे उदघाटन जळगांव लोकसभेचे खासदार श्री उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी तहसिलदार श्री मिलींद वाघ साहेब,बीडीओ श्री संदीप वायाळ साहेब, नपा चे उपमुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड,पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पाटील, न.पा.चे संजय सुदाम चौधरी, आरोग्य निरिक्षक चव्हाण साहेब,प्रभागचा नगरसेविका सौ.कल्पना चौधरी , अर्बनबँक चे संचालक पंडितनांना चौधरी नगरसेवक बाळासाहेब संदानशिव मान्यवर उपस्थित होते.मंडळाचे राजेंद्र देसले, विजय चौधरी, पराग चौधरी, ब्रिजलाल पाटील, राकेश चौधरी, गौरव चौधरी,शंकर देसले, हरिश्चंद्र पाटील, विष्णू पाटील, रवींद्र साळी, किरणभाईजी,अल्ताप बागवान,असलम बागवान, मोहसीन पठाण, हितेश देसले, चेतन चौधरी, भूषण अहिरराव, रुणाल पाटील, चेतन पाटील,महेश वाणी, संजय बाविस्कर, जितेश भार्गव , रोहित मकवाना मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
परिसरात येणारे प्रत्येक नागरीक ह्या प्रवेशद्वारतुनच प्रवेश करून आल्याने तो निर्जंतुक होऊन आल्याने परिसराला संभाव्य आजारा पासून अधिकाधिक बचाव करता येईल ह्या स्तुती पात्र कार्य करणाऱ्या मंडळाचा कार्यकर्त्यांचे अभिनंदन खासदार श्री उन्मेष पाटील , करणदादा पाटील, यांनी केले व तहसीलदार श्री वाघ साहेब यांनी सोशल डिस्टनसिंग बाबत कार्यकर्ते घेत असलेल्या काळजी चे कौतुक केले.नगरपरिषद तर्फे घेत असलेल्या खबरदारी बाबत श्री गायकवाड साहेब आरोग्य निरीक्षक श्री चव्हाण साहेब यांचे आभार नागरिकांनी ह्या वेळेस मानले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.