Halloween party ideas 2015


महाविद्यालयीन
परीक्षांबाबत तातडीने खुलासा करा :

 तुषार जाधव

धुळे  प्रतिनिधी:- महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक लवकर ठरत नसल्याने  विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य समाजकार्य विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष तुषार जाधव यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
          कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर विद्यापीठांच्या परीक्षांसाठी आँनलाईन परीक्षा, एका-एका तासाची आँनलाईन परीक्षा, स्काईपद्वारे आणि प्रकल्प सादरीकरण यासह विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. तसेच आता राज्यभरातील विद्यापीठात परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. त्याचादेखील अहवाल प्रतीक्षेत आहे. परीक्षा नेमकी कशी होणार? हे विद्यार्थ्यांना स्पष्ट नसल्याने त्यांची धाकधूक वाढत आहे. प्रत्येक विद्यापीठ क्षेत्रात त्याच विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थी नाहीत, बाहेरील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. लाँकडाऊन मुळे विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे लाँकडाऊन ३ मे पर्यंत असेल त्यानंतर लगेचच परीक्षा घेणे हे कठीण आहे.
        विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा महत्त्वाच्या नाहीत तर प्रश्नपत्रिकेचे मूल्यांकन, निकालाची घोषणा करणे व पुढील वर्षासाठी प्रवेश हेही महत्त्वाचे आहे. आँनलाईन व स्काईपद्वारे परीक्षा घेण्यासाठी इंटरनेटची उभारणी कशी करणार? ही सुविधा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार का? एका-एका तासाची आँनलाईल परीक्षा घेण्यासाठी काय तयारी आहे व सामाजिक दुरावा कसा पाळणार आहात?  जर संपूर्ण सार्वजनिक वाहतूक बंद असेल तर आपण विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यत आँफलाईन परीक्षेसाठी कसे आणणार? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी काय नियोजन आहे. आदींवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या कडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे.

कोट

*प्रतिक्रिया*
           काल मी दुरध्वनी वरून मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रेंशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले की  "परीक्षा घेण्याचा निर्णय विचारपूर्वकच केला जाईल. अजून दहा ते पंधरा दिवसात सर्व निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अस्वस्थता बाळगण्याचे काही कारण नाही, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. निर्णय जाहीर होईपर्यंत आम्ही कोणालाही परीक्षा संदर्भात प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. आम्ही फक्त केंद्रीय विद्यापीठांचा निर्णय घेवू राज्यस्तरीय विद्यापीठाचा निर्णय राज्य सरकार घेईल. मी सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांशी बोललोय की, कोणताही निर्णय घेताना घाईघाईने घेऊ नका.  त्याचप्रमाणे पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया दीड ते दोन महिने लांबेल. असे मा.धोत्रे दुरध्वनी वरून बोलताना म्हणाले.
          तुषार जाधव
    अध्यक्ष महाराष्ट्र राज्य समाजकार्य विद्यार्थी समन्वय समिती

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.