Halloween party ideas 2015


पालघर जिल्ह्यातील जमावांकडून निरपराध संतांची हत्येची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी--आमदार स्मिता वाघ

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अशा पुरोगामी महाराष्ट्रात पालघर येथील गडचिंचले येथे विकृत मानसिकतेच्या जमवा कडून पोलिसांच्या समक्ष साधूंची व चालकाची ठेचून हत्या होते. ही अतिशय धक्कादायक व निंदनीय बाब आहे. अशा समाज विघातक विकृत वृत्तीला कठोर शिक्षा शासनाने केली पाहिजे अशी मागणी आमदार स्मिताताई वाघ, कपीलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर श्री हंसानदजी महाराज , भारतीय जनता पार्टी अमळनेर तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील व शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, बबलु राजपूत, चंद्रकांत कंखरे व राहुल चौधरी यांनी अमळनेर प्रांत सिमा आहिरे याच्या कडे निवेदन देवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.