Halloween party ideas 2015





प्रभाग क्रं 14 मधील रस्त्यांवर कलर काम करून कोरोना आजारा विषयी जनजागृती


अमळनेर प्रतिनिधी
कोरोना आजाराने अमळनेर तालुक्यात शिरकाव केला असून प्रभाग क्रं 14 सह परिसरातील नागरिकांन मधे जणजागृती व्हावी व प्रशासनाला मदत करून नागरिकांनी घरातच थांबावे या उद्देशाने नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील यांनी स्वः खर्चातून रस्त्यांवर कलर काम करून नागरिकांन मधे जणजागृती करण्याच्या कामाची सुरवात केली असून या कामाचा शुभारंभ नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील व पत्रकार ईश्वर महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आला असून सोबत रवि पाटील कपिल पाटील (म.पोलीस), मनोज पाटील, कल्पेश साळुंखे, डॉ.रईस बागवान, प्रकाश सोनवणे, संजय पाटील (इंजिनिअर), किरण अहिरे, सागर विसपुते राज लाड अंकित देशमुख व पेंटर संदिप सातपुते, गणेश सातपुते यांनी सहकार्य केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.