Halloween party ideas 2015


अमळनेर-- तालुक्यातील शेतकरी वर्ग सर्व बाजुंनी अडचणीत आला आहे.२०१९-२० चा खरीप हंगामाच्या पीक विम्याचे पैसे विमा कम्पनी कडून त्वरित मिळावेत अशी मागणी अमळनेर तालुक्यातील शेतकऱयांनी केली केली आहे.या बाबत अमळनेर चे प्रांताधिकारी, कृषिमंत्री,महसूलमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2019-20 मध्ये अमळनेर तालुक्यातील 28 हजार कापूस उत्पादक शेतकऱयांनी कापसाचा प्रति हेक्टरी 1800 रु पीक विमा हफ्ता भरलेला आहे. जळगांव जिल्ह्यामध्ये ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. या कंपनी ने पीक विमा काढलेला आहे.सदर विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर कॉल केला तर ते कॉल घेत नाहीत. अमळनेर तालुक्यात एकूण 30 हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतलेला आहे. अमळनेर तालुक्यात 50 गावात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला.तसेच उर्वरित 86 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे 80 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले.हेक्टरी एक ते दीड क्विंटलच कापूस आला . पीक कापणी प्रयोग हे डिसेंबर अखेर आटोपले होते.तरी शेतकऱयांना 31 मार्च पर्यंत पीक विम्याचा पैसा मिळायलाच हवा होता. .खरीप हंगाम हा पूर्ण आला नाही.हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम सुद्धा वादळ व गारपीट मुळे गेला. तसेच कोरोनामुळे दूध,भाजीपाला अंगावर पडत आहे.शेतकरी पूर्णपणे सर्व बाजूनी अडचणीत आलेला आहे.तरी शासनस्तरावर पालकमंत्री,कृषिमंत्री,महसूलमंत्री व वरिष्ठांनी दखल घ्यावी व शेतकऱयांना त्वरित पीक विम्याचे पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी
शिरूड वि.का.सोसायटी चे चेअरमन प्रा.सुभाष सुकलाल पाटील , काँग्रेस आय. तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे,शहर अध्यक्ष मनोज दाजीबा पाटील, अँडव्होकेट गिरीश प्रकाश पाटील,
माजी कृउबा समिती संचालक धनगर दला पाटील, अजीम मुजावर यांनी केली आहे.
सदर चे निवेदन अमळनेरच्या प्रांताधिकारी सिमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले आहे.
तसेच संबाधित मंत्र्यांना ईमेल द्वारे कळविण्यात आले आहे.

फोटो
प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देतांना प्रा. सुभाष पाटील

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.