कळमसरे
जगभरात तसेच भारतात देखील कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने त्यात अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यातच संपूर्ण भारतात दिनांक 30 मे पर्यंत लोकडाऊन वाढला असल्याने त्यातील सर्व नियम देखील ग्रामीण भागात पाडले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कळमसरे ग्रामपंचायत तर्फे प्रत्येक घरातील नागरिकांना मोफत 3000 मास्कचे व विप्रो कंपनी तर्फे संतूर साबणांचे वाटप आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत प्रत्येक घरी वाटप करण्यात आले.
या वाटप प्रसंगी सरपंच कल्पना पवार ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र राजपूत, तुकाराम महाजन देविदास चौधरी, बबलू पवार, ग्रामविकास अधिकारी एस.डी.सोनवणे तसेच भागवत कोळी, नंदू शर्मा, लिपिक प्रदीप महाजन,योगेंद्र राजपूत, योगेश गुरव आदी उपस्थित होते.

