Halloween party ideas 2015



कै रजनी अशोक माळी यांच्या १३ व्या पुण्यस्मरण निमित्ताने दोन शब्द..

ना ध्यानी,ना मनी,गेलीस मामी आम्हास सोडूनी....
विसरता न येता,तुमच्या आठवणी
कंठ दाटूनी येतो,येते डोळयात पाणी...
तुमची आठवण येते मामी क्षणोक्षणी.....

कै रजनी माळी यांचे आज १३ वे पुण्यस्मरण... मामी आपल्या नावातच उदारता,प्रेमळ, सहनशीलता, आपुलकी सगळे ओंतूबन भरलेले होते.वर्षे कुठे निघून गेले लक्षात आले नाही... माई त्यावेळी आठ वर्षाची असेल...आज आपण नसल्या तरी आपल्या आठवणी आमच्या जवळ आहेत. आभाळभर माया आणि निस्वार्थ प्रेम ,परिवार व नातेवाईकांवर करणाऱ्या आपण. ..न बोलताच मनातील सगळं काही समजणारी ,खचलेल्या मनास,
स्व-अस्तित्वाची जाणीव करून देणारी मामी....
घराला घरपण देणारी..मामा व आमच्या माईवर निस्वार्थ प्रेम करणारी..योग्य मार्गदर्शन करणारी मामी आपल्याबद्दल कितीही लिहण्याचा प्रयत्न केला तरी,शब्द फिके आहेत..मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा आई वीना भिकारी"या ओळीतून आई शब्दाची महती स्पष्ट केली आहे. मामी आपण सोडून गेल्यानंतर माईला मामांनी एका आईचे प्रेम दिले...तिला समजून घेतले..तिच्या आवडीनिवडी आपणास जशा माहीत होत्या त्या आमचे मामाश्री पुर्ण करीत असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे...
मामांची लाडकी लेक माई म्हणजे मामीसारखीच.....
प्रेमाचा अथांग सागर..मामाचा जिवकी प्राण..माई आज आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करीत असतांना मामा तिच्यामागे सावलीसारखे उभे असतात.तिच्या सुख दुख्खात नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
कै मामीबद्दल मला दोन ओळी आठवतात...
कुटुंबासाठी सतत झटणारी
निस्वार्थ पणे प्रेम करणारी
सर्वांची काळजी घेणारी मामी
घराला आपले सर्वस्व मानणारी मामी
आणि मामीला आपले सर्वस्व मानणारी माई व मामा....
मामी आज आपल्या १३पुण्यस्मरण निमित्ताने आमच्या परीवाराकडून भावपुर्ण आदरांजली..
तुमचं असणं आमच्यासाठी सर्व होतं
हे आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे.
पण तुमचं नसणं ही मोठी उणीव आहे...


शब्दाकंन

ईश्वर महाजन शिक्षक&
पत्रकार अमळनेर
9860352960


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.