अमळनेर प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि.२३ मार्च पासून देशभर लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे ऐन हंगामात एल.आय.सी.विमा प्रतिनिधींना (एजंट) नवीन व्यवसाय मिळेनासा झाला. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हि बाब लियाफी या देशव्यापी विमा प्रतिनिधींच्या संघटनेने भारतीय जीवन विमा महामंडळाच्या निदर्शनास आणून दिली.आणि विमा प्रतिनिधींना कोविड अँडवान्स देण्यात यावे.अशी मागणी केली. त्यावर महामंडळाने (एल.आय.सी.) सामाजिक बांधिलकी जपत देशातील अँडवान्ससाठी पात्र असलेल्या सुमारे ६.६५ लाख विमा प्रतिनिधींना सुमारे २७१० करोड रुपये अँडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला.सदर निर्णयानुसार विमा प्रतिनिधींच्या बँक खात्यात काल सायंकाळी कोविड अँडव्हान्सची रक्कम जमा झाली आहे. सदर अँडव्हान्सचा फायदा देशासह अमळनेर शाखेच्या सुमारे पाचशे विमा प्रतिनिधींना मिळाला आहे. त्यामुळे विमा प्रतिनिधींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एल.आय.सी.चे अमळनेर शाखेतील विमा प्रतिनिधींनी आभार मानले आहे.