कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाणेगांव ता पाचोरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना विषाणू मुळे लाॅकडाऊन मुळे समाजातील प्रत्येकाने घराघरात साजरी केली ...परंतू जयंतीनिमित्त चांगला उपक्रम म्हणून गावात पोलीस पाटील नितीन जमदाडे यांच्या संकल्पनेतून शिस्तबद्ध पद्धतीने कॅप, मास्क , हँड ग्लोव्हज घालून संपूर्ण गावाची साफसफाई करण्यात आली ...त्यात समाज मंदीर परिसर, जि प प्राथमिक शाळा वाणेगांव, राधाकृष्ण मंदिर परिसर,हनुमान मंदिर परिसर आणि वाणेगावातील गल्लोगल्ली साफ करण्यात आली ....याकामी वाणेगांव चे पोलीस पाटील नितीन सुकदेव जमदाडे, राजेंद्र काशिनाथ सिंगारे, अजय रमेश संसारे आणी समाधान काशिनाथ सोनवणे यांनी अशा प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात साफसफाई करून अभिवादन करताना शासनाच्या कायद्यात राहून गर्दी न करता संपूर्ण गांव स्वच्छ केले ..आणि खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेबआंबेडकरांना आदरांजली वाहिली ..
सर्व . स्तरावर पोलीस पाटील नितिन जमदाडे राजु सिगारे अजय ससारे आणी समाधान सोनवणे याचे गावातुन आणी परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे व प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सर्वाचे या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
*सोशल डिस्टन्स ठेवून केली स्वच्छता मोहीम*
पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील पोलिस पाटील नितीन जमदाडे व युवकांनी गावात स्वच्छता मोहिमेत सहभागी होवुन मोजक्याच युवकांच्या पुढाकारातुन गावात स्वच्छतामोहीम राववुन एक आगळीवेगळी अशी मोहिम राबवून प्रत्येक्षात कुठेही चम्मकोगरी न करता प्रत्येक्षात गावात स्वच्छता करुन दाखविली.या स्वच्छता मोहिमेत सहभागी पोलिस पाटील व युवकांनी सोशल डिस्टन्स ठेवून संपुर्ण गावांतील प्रत्येक वार्डातील गल्ली बोळात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेत कुठल्याही प्रकारची गर्दी न करता फक्त चार जणांना सोबत घेऊन संपुर्ण गावांतील प्रत्येक गल्ली बोळात स्वच्छता मोहिम चांगल्याप्रकारे राबविल्याने या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
