नंदुरबार जिल्हात पुन्हा २ रुग्ण आढळले..!
शहादा येथे १ व अक्कलकुवा येथे..!
रुग्णांची संख्या झाली आता १३
@ दिलासादायक;-५२ व्यक्तीचे अहवाल आले निगेटिव्ह..!
नवापूर ;-हेमंत पाटील
नंदुरबार जिल्ह्यात अजून
२ रुग्ण कोरोणा पोझीटिव्ह आढळुन आल्याने कोरोणा रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे यामुळे चिंता अजुन वाढली असुन लोकांनी घाबरुन न जाता सावधानता व काळजी घेण्याची गरज आहे. यात अक्कलकुवा व शहादा प्रत्येकी एक रुग्णाच्या समावेश आहे.नंदुरबार जिल्हात एक ही रुग्ण नव्हता.सर्वत्र वातावरण कोरेणामुक्त असतांना अचानक कोरोणा रुग्ण आढळुन आला यातील एका रुग्णाचा मुत्यु झाला असुन ग्रीन झोनकडुन नंदुरबार जिल्हा आता रुग्ण वाढत असल्याने रेड झोनकडे येत आहे.
अक्कलकुवा येथील एक पुरुष (५८ ) आणि शहादा येथील एक मुलगी (१५ ) अशा दोघांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. नंदुरबार जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे. ५२ व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

