*जळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था पारोळा सभासदाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत ५१ हजार रुपायाचा चेक सुपूर्द*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. देशात लाँकडाऊन आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झालेली आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून देणे लागतो या भावनेने जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शाखा पारोळा सभासदांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला नुकताच 51 हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था पारोळा सभासदांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मान आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्याकडे 51000रुपयाचा मदतनिधी चेक सूपूर्त करण्यात आला प्रसंगी रावसाहेब मांगो पाटील अध्यक्ष प्रगती गट यशवंत शामरावव शिंदे राजेंद्र आत्माराम सोनवणे संचालक लेखापाल प्रविण सोनवणे उपस्थित होते..
