Halloween party ideas 2015


नवापूर शहरातील जिग्नेश जयस्वालने वाढदिवस साजरा न करता येणारा खर्च दिला सीएम व पीएम सहायता निधीत..!
आजचा युवकाने ठेवला एक आदर्श..!

नवापूर ;-ता २८ हेमंत पाटील
नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त जिग्नेश मैकुलाल जयस्वाल यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाला होणारा सर्व खर्च पीएम,सीएम सहायता निधी ला दिला आहे.जिग्नेश जयस्वाल यांनी याबाबतची पोस्ट मी प्रसिद्धीसाठी करीत नाही पण ही पोस्ट पाहिल्यामुळे अनेक हात मदतीसाठी पुढे येतील अशी त्यांना आशा आहे.
आजची नवीन पिढी मोठ मोठे बँनर लावुन केक कापुन आपला वाढदिवस साजरा करते.मोठा खर्च करतात मात्र नवापूर शहरातील एक युवक जिग्नेश जयस्वाल यांनी कोरोणाच्या काळात सर्वत्र संकटाचा सामना करत आहोत.कोरोणात हातावर पोटभरणारे,गोरगरिब,मध्यवर्गीययाची उपासमार होत आहे.या संकटात वाढदिवसाचा आनंद साजरा न करण्याचा निर्णय घेतला.मित्रांनी ही त्याचा निर्णयाचे स्वागत केले.वाढदिवसावरील सर्व खर्च पीएम व सीएम निधीत दिला आहे.कोरोणा विषाणुवर लढण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‌ घोषित केलेल्या पंतप्रधान मदत निधी आणि सीएम रिलीफ फंड महाराष्ट्र मध्ये देण्याचे ठरवले.
ही रक्कम मोठी नसली तरी आजचा युवकाची मानसिकता व देण्याचे मुल्य दिसुन आले.या युवकाचा आदर्श इतरांना प्रेरणा देणारा आहे .समाधानकारक आहे वाढदिवसानिमित्त खारीचा वाटा म्हणून केलेले सामाजिक कार्य एक आदर्श ठरले आहे.आजचा युवक वाया केला नाही.तर तो देशप्रेमा सोबत मदतीचे व माणसुकीचे मुल्य जपणारा आहे हे दिसुन आले.जिग्नेश जयस्वालचा या कार्याचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

(कोट करणे)
मी माझा वाढदिवस साजरा न करता खर्च येणारी रक्कम कोरोणा विषाणुवर लढण्यासाठी आपल्या देशाचे "पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी" यांनी‌ घोषित केलेल्या पीएम मदत निधीआणि
सीएम रिलीफ फंड मध्ये देण्याचे ठरवले.ही रक्कम मोठी नसली तरी मी आज समाधानी आहे माझ्या वाढदिवसानिमित्त खारीचा वाटा म्हणून सामाजिक कार्य केले याचा मला आनंद आहे आणि गर्व ही आहे.
@ जिग्नेश जयस्वाल नवापूर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.