कोरोना लाँकडाऊनचा काळात भरत गावीत यांनी लाखो रुपयांची सिमला मिरची पोहोचवली नवापूर करांच्या प्रत्येक घरात...!
वाटप करायलाही मन मोठं लागतं हो.!
नवापूर ;-ता २१ हेमंत पाटील
समाजसेवेच्या वसा घेतलेले नंदुरबार जिल्हाचे माजी जि प अध्यक्ष व भाजपाचे नेते विद्यमान जि प सदस्य भरत माणिकराव गावित यांनी नवापूर शहरातील प्रत्येक घराघरांमध्ये लाखो रुपयांची सिमला मिरचीचे वाटप केले आहे. नवापूर शहरात असलेल्या दहा ही प्रभागात एक घर न सोडता भरत गावीत यांनी सिमला मिरची पोहचवली.
सध्या कोरोणाच्या महा विषाणूमुळे देश लाँकडाऊन आहे
सर्वांनाच संकटाचा सामना करावा लागत आहे अशा भरत गावीत यांनी माणुसकी सेवेच्या वसा जपत आपल्या शेतातील पॉलिहाऊसमधील आधुनिक पद्धतीने लावलेल्या लाखो रुपयाच्या सिमला मिरचीचे पाकीट वाटप केले. शेती उत्पादनात कार्यकुशल असलेले बळीराजा भरत गावीत लाँकडाऊन झाल्यापासुन गरजुना जेवण देत आहे त्यासोबत त्यांनी लाखो रुपये किंमत असलेली सिमला मिरचीचे पाकीट तयार करुन नवापूर शहराचा घरात ते दिले.त्यांनी याचा गाजावाजा न करता आपल्या कार्यकर्तांचा हातुन सिमला मिरची वाटप करायला लावली. लोकांमुळे गोरगरीब लोकांच्या सामान्यांची खूपच हाल होत आहे हे पाहून भरत गावित नेहमीप्रमाणे लोकांना मदत करत आहेत त्यामुळे सामाजिक जबाबदारी जाणीवेने त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. बाजारात सिमला मिरची ला मोठी मागणी आहे या सिमला मिरचीच्या शेतीतून मिळणाऱ्या लाखो रुपयाचा उत्पनाचा विचार न करता त्यांनी स्वतःच्या पॉलिहाऊसमधील सिमला मिरचीचे पाकीट तयार करून वाटपाचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी ते वाटप केले समाजसेवी उपक्रमातून माणूसपण जपत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी या उदात्त हेतूने सिमला मिरचीचे वाटप केले.माणसाने माणसाशी माणसा सम वागुन मदतीचा हात पुढे करत लाखो रुपयाची सिमला मिरची घराघरात द्यायला ही मोठ मन लागते असे नागरीकांनी सांगितले.माणसाकडे भरपुर पैसा असुन ही स्वताचा खिशातुन एक दमडी ही न देणार्याना ही एक चपराक आहे.भाऊसाहेब सिमला मिरची घर पोहच मिळाली आभारी आहोत असे व्हाट्सअप वर मँसेज व्हायरल होत अाहेत.
