अमळनेर:- तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढल्यामुळे कृषि उपन्न बाजार समिति मधील बंद करण्यात आलेली धान्य खरेदी दि.२२ पासून सुरु करण्यात येणार असल्याबाबत निर्णय आज आ.स्मिता वाघ यांच्या सुचनेनुसार प्रांतधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अमलनेर येथील कृषि उपन्न बाजार समितित तालुक्यासह जिल्हाभरातून मोठी आवक होत असते. बाजार समिति बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचणीत भर पडत होती. त्यामुळे बाजार समिति नियमित सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ह्या बैठकीला बाजार समिति सभापति प्रफुल्ल पवार, बाजार समिति संचालक हरी भिका वाणी, शंकर बितराई उपस्थित होते.
कृषि उपन्न बाजार समितित माल विक्रीला येताना वाहन चालक व शेतकरी ह्या दोघांनाच प्रवेश देण्यात येईल तसेच दोन पेक्षा अधिक व्यक्ति असल्यास लिलाव करण्यात येणार नाही शेतकऱ्यांनी बाजार समितित 'सोशल डिस्टसींग' राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समिति सभापति प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाने केले आहे