Halloween party ideas 2015



आमलाण येथे डिजिटल वर्गाचे उदघाटन
नवापूर (प्रकाश खैरनार) तालूकयातीँ जि.प.शाळा आमलाण येथे डिजिटल शाळा उद्घाटन व सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब हे होते.तर प्रमुख अतीथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे , केंद्र प्रमुख सतीष कदमबांडे , उदयोजिका डॉ. तेजल शाह , शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस् आदिचा उपस्थितीत संपन्न झाला
जि.प. शाळा आमलाण येथे पालक व शिक्षणप्रेमी यांच्या आर्थिक योगदानातून शाळेचे अंतरंग पेंटिंग करण्यात आले व दोन्ही वर्गात एल.ई.डी.टी व्ही.लावून इयत्ता पहिली व दुसरी साठी व इयत्ता तिसरी चौथीसाठी असे दोन स्वतंत्र वर्ग डिजीटल क्लासरुम बनवण्यात आले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर व उपशिक्षक सोनवणे सर यांनी लोकवर्गणी जमा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व युवा सामाजिक सेवा समिती आमलाण यांच्यासमवेत एक पालक मेळावा घेऊन डिजीटल क्लासरुम ची संकल्पना व महत्त्व पटवून दिले. सदर उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत युवा सामाजिक सेवा समितीचे अध्यक्ष किसन गावीत व देविदास गावित व त्यांची टीम व शाळा व्यवस्थापन समिती यांनी पुढाकार घेत लोकसहभागाची चळवळ सुरू केली व पालकांनीही लोकसहभाग 16200/-रू दिला तर दोन्ही शिक्षकांनीही 5000/- रू देऊन सहभाग नोंदवला. पालकांव्यतिरिक्त गावातील शिक्षणप्रेमी यांनी ही सहभाग नोंदवला. त्यामध्ये भिकन वसावे 2500/-, दामू वसावे 2500/-, देविदास गावित 1000/- ,तलाठी गणेश बेदरकर 1000/-, शिक्षण प्रेमी सुधीर निकम LIC OF INDIA 2500/- रु,शाळेच्या माजी मुख्याध्यापिका पुष्पा भवरे 4000/-रू सार्वजनिक हायस्कूलच्या उपशिक्षिका मीनाक्षी गावित 2000/-रू तसेच कार्यक्रम प्रसंगी आदरणीय गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब, गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे साहेब, केंद्रप्रमुख सतीश कदमबांडे साहेब, डॉक्टर तेजलबेन शहा यांनीही रोख रक्कम व बक्षीस देऊन विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम प्रसंगी युवा सामाजिक सेवा समितीचे अध्यक्ष किसन गावीत व त्यांच्या टीमने सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या पाणी बॉटलचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून शाळेला एक व्हील चेअर भेट देण्यात आली. वर्गणीदार तसेच शाळेकरिता उपयोगी वस्तूंची देणगी देणाऱ्या मान्यवरांचा गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब व गटशिक्षणाधिकारी चौरे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या परिस्थिती संदर्भात गावातील योसेफ गावित यांनी ग्रामस्थांच्यावतीने मनोगत व्यक्त केले व शाळेतील गुणवत्तेविषयी सर्वांना माहिती दिली तसेच दररोज घड्याळी एक तास ही शाळा जास्त वेळ चालत असल्याचे ही आवर्जून सांगितले व शिक्षकांचे कौतुक केले.
गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांकडून अंक वाचन व इंग्रजी वाक्य वाचन करून घेतले व विद्यार्थी वाचत असल्याचे पाहून शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी शिक्षक बदलल्यास शाळा बदलते याचे हे उदाहरण असल्याचे सांगितले व या शाळेला पाच हजार रुपये निधी देण्याचे सांगितले. केंद्रप्रमुख यांनी एखाद्या गावाला चांगले शिक्षक लाभले असता त्यांच्याकडून चांगलं काम करून कसे घेता येईल याचे हे गाव व येथील पालक एक उत्तम व आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच याबद्दल शिक्षकांचे, शाळा व्यवस्थापन समिती, युवा सामाजिक सेवा समिती यांचे कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, पंचक्रोशीतील सर्व उपस्थितांनी मुलांचा गुणगौरव केला. अष्टपैलू व्यक्तिमत्व ठोंबरे सर यांनी karaoke गीतांवर स्वतः गायन करून विद्यार्थ्यांकरवी सुंदर नृत्यांचे सादरीकरण करवून घेतले.
डॉक्टर तेजलबेन शहा यांनी कोरोना व्हायरस विषयी सर्व उपस्थितांना काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी मंडप स्टेज याची व्यवस्था राजेश कोकणी यांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र वसावे, पालक अरविंद वसावे, सुरेश वसावे, रविदास वसावे, किशोर कोकणी, दिपक वसावे, नितेश वसावे, राजू वसावे, इलामजी वसावे, कृष्णा गावित, गणेश गावित, ममता वसावे, यशोदा वसावे ,आशा वसावे, भीली वसावे, सया वसावे, कविता वसावे, मारीयम वसावे,मीना गावित, तसेच शिक्षक मित्र यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक सचिन सोनवणे तर प्रास्ताविक व आभार ठोंबरे सर यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.