Halloween party ideas 2015


नवापूर भाजी बाजारात सुरक्षितताची आवश्यकता ---- नवापूर प्रकाश खैरनार - सध्या देशातील प्रत्येक गावात कोरोणा सारख्या महामारी ने घेरले असून प्रत्येक व्यक्ती या महामारी पासुन वाचायला पाहत असले तरी आज देखील कित्येक नागरिक विना मास व रूमाल न लावता बिनधास्त वागताना दिसत आहे या प्रकारात नवापूरचा नागरिक देखील मोडला जातांना दिसून येत आहे पोलिस प्रशासन आपली जवाबदारी अत्यंत कडेकोट पणे पालन करत असले तरी भाजी मार्केट मध्ये मात्र सुरक्षितता चा आभाव दिसत आहे कारण शहरातील भाजी मार्केट हे नगरपालिका जवळ भरत असले तरी जागा फारच छोटी आहे यामुळें भाजी विक्रेता व खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहक मध्ये योग्य अंतर राहत नाहि व तसे राहणार दैखील नाही कारण एकाच जागेवर व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा बाजार भरणे किंवा भरविणे हे योग्य नसून आजाराला निमंत्रण देण्याचे क्रूत्य दिसत आहे असे जाणकारांचे मत असून या बाजारात भाजी घ्यायला जाणे व भाजी घेण्याचे धोक्याचे आहे परंतु भाजीपाला शिवाय चालणार कसे शेवटी पर्याय नाही परंतु या साठी पालिकेने उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे नाहि तर शनिवारी भरत असलेल्या नदि किनारी भाजी बाजार भरण्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणजे मोठ्या जागेचा वापर योग्य प्रमाणात करता येईल म्हणजे गावात गर्दी देखील होणार नाही आणि विक्रेता व ग्राहक यात सुरक्षितता राहील महामारिचा वाढता वेग पाहता पालिका प्रशासन व नगराध्यक्ष व नगरसेवकांनी वेळिच निर्णय घेणे गरजेचे आहे आज काही शहरांमधील दुकाने , भाजी बाजार यात सुरक्षतेवर भर दिला जातांना दिसत आहे एका वेळी एकच व्यक्ती रिंगणात उभा राहुन खरेदी करतांना दिसत आहे तशी आखणी व व्यवस्था प्रशासनाने केली आहे या कामासाठी तहसीलदारांनी देखील योग्य ते आदेश व मार्गदर्शन करण्याची अवश्यकता पोलिस प्रशासन तर सज्ज आहे शहरात लोकडाउन बराच प्रमाणात असून भाजी मार्केट विषयी नागरिकांची व ग्राहकांची नाराजगी दिसत असून जनतेचा सुरक्षितता साठि योग्य उपाययोजना पालिका ने कराव्यात व पदाधिकाऱ्यांनी देखील सहकार्य करावे जेणेकरून महामारीला आळा घालता येईल व नागरिकांचे आरोग्य वाचवता येईल.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.