Halloween party ideas 2015


*महिला ही वयोप्रमाणे विविध रूपे घेतात-----पार्वतीबाई चौधरी*

*सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व महिलादिना निमित्त विविध कार्येक्रम संपन्न*
ज्याला आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला पत्नी म्हणून कळली तो सावित्री चा जोतिबा झाला असे आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरवात करून महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा जेष्ठ पदाधिकारी पार्वतीबाई चौधरी(माळी)यांनी महिलांचे वास्तविक जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता महेश माळी यांनी केले
अमळनेर येथील सावित्रीमाई फुले महिला मंडळ तर्फे क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिवस संयुक्त पने विविध कार्यक्रम राबवून संपन्न झाला यावेळी कार्येक्रमाच्या सर्वप्रथम सावित्रीमाई फुले व महापुरुषयांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योत्स्ना महाजन कु.प्रमल माळी यांनी स्वागत गीताने सुरुवात केली महिलांच्या जीवनावर गीत गायन,डान्स स्पर्धा विविध मनोरंजात्मक खेळ संपन्न होऊन विजेतांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सावित्रीमाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाबाई महाजन,पार्वतीबाई चौधरी,सचिव मोहिनी खैरनार,ज्योत्स्ना जाधव उपस्थित होते यशस्वीतेसाठी,कल्पना महाजन, अनिता पाटील,अनिता महाजन,सुरेखा पाटील,भास्कर सैदाणे यांनी प्रयत्न केले यावेळी क्षत्रिय फुलमाळी समाजाचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललिता माळी तर आभार कविता महाजन यांनी केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.