Halloween party ideas 2015


आज होणारे शिक्षकांचे राज्य अधिवेशन स्थगित
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा राज्य प्रवक्ते
किशोर पाटील कुंझर कर यांची माहिती

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे आज दिनांक 12 रोजी औरंगाबाद येथे पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद व राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर यांचा राज्य पुरस्कार प्रदान सोहळा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा राज्य प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी कळविले आहे.
सदरील पहिल्या राज्य अधिवेशनाला राज्य शासनाने विशेष कर्तव्य रजा मंजूर केली होती तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा शिक्षक पतपेढी च्या वतीने 40 हजार रुपयांचे विशेष कर्ज, ग सं सोसायटीच्या वतीने आणि भुसावळ शिक्षक पतपेढी च्या वतीने 30 हजार रुपयांचे विशेष कर्ज राज्य अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनी साठी मंजूर करून प्रदान करण्यात येत होते.
राज्य अधिवेशन तूर्तास स्थगित केल्याने संबंधितांना जो त्रास झाला त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
राज्य अधिवेशनात मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले तर त्यांच्यासमोर राज्यस्तरीय प्रश्न मांडता येतात, सांगता येतात ,हक्काने एखादी मागणी सोडवून घेता येते. सध्या राज्य मंत्रिमंडळाचे ही अधिवेशन सुरू आहे. त्यातल्या त्यात करोणा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाकण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे साहेब ,जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश अण्णा पाटील,जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील व सर्वपक्षीय मान्यवरांनी यांनी केले आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे 11 ते 13 मार्च 2020 रोजी आयोजित व आज सन्मित्र कॉलनी औरंगाबाद येथे होणारे पहिले खुले राज्य अधिवेशन,आणि राज्यस्तरीय शिक्षण परिषद व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.