पातोंडा ता.अमळनेर - आज जळगाव येथे भरारी बहूउद्देशीय संस्था आयोजीत सहाव्या बहिणाबाई महोत्सवात सामाजिक , शैक्षणिक व नालाखोलीकरण या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी परदेशी , आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पातोंडा परीसर विकास मंच ने सामाजिक , शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची भरारी बहूउद्देशीय संस्थेने दखल घेत बहिणाबाई विशेष पुरस्कार घोषीत केला होता. तो या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर विकास मंचाच्या कामगिरीचा गौरव करण्यात आल्याने सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून विकास मंच व गावाचे नाव राज्य पातळीवर पोहचविण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली अशी भावना विकास मंचाच्या सदस्यांनी व्यक्त केली. तसेच या कामात प्रेरणा देणारे मगन सूर्यवंशी सर, कपिल पवार , रावसाहेब बोरसे , कन्हैया थोरात यांचे मंचचे सदस्य विलास चव्हाण यांनी आभार मानले. या सोहळ्यास विलास चव्हाण, महेंद्र पाटील सर, राजन बिरारी , सागर मोरे , राकेश पाटील , संजय महाले , अमित पवार , राहूल महाले व प्रा भुषण बिरारी या विकास मंचचे सदस्यांनी उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.
फोटो -
फोटो - पुरस्कार प्रदान करतांना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी परदेशी , आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे व विकास मंचचे सदस्य