गौण खनिज भरारी पथकाचे लोकेशन देणाऱ्यावर गुन्हा दाखल
अमळनेर प्रतिनिधी
दि.१७/१/२०२० रोजी १:३५ वाजता मा.तहसिलदार सो व पथक कर्मचारी असे गौण खनिज चोरी प्रतिबंधक गस्त करत असतांना भिलाली गावाजवळ एक ट्रॅक्टर पथकास पाहुन पळुन जातांना दिसले. सदर भागात तपास करता एक इसम नामे अनिल महारु वडर रा.बेटावद हा संशयीतपणे मिळुन आला मा.तहसिलदार यांनी त्याचेकडे चौकशी करता सदर इसम हा रेती चोरी करण्यासाठी पांझरा नदीत उतरणाऱ्या ट्रॅक्टर चालकास पथकाची माहिती देवुन गुन्ह्यास सहकार्य करतांना मिळुन आला. म्हणुन पथकाचे लोकेशन घेवुन ट्रॅक्टर चालकास माहिती देणाऱ्या सदर इसमासह पळुन गेलेल्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द मंडळ अधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास राहुल फुला सपोनि यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. रोहिदास जाधव,पोना २३५५ भास्कर चव्हाण व पोना ८३३ सचिन निकम हे करीत आहे.