Halloween party ideas 2015


एकदिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत फक्त सहा द्विशतकवीर एकोणपन्नास इतके वय असलेलं " वनडे क्रिकेट " हे क्रिकेटचं दुसरं अपत्य. मेलबोर्नच्या जगातील सर्वात मोठया मैदानावर या त्या काळच्या चपळ क्रिकेट बालकाचा ५ जानेवारी १९७१ रोजी अपघाताने जन्म झाला. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दरम्यान ४० - ४० षटकांचा हा सामना भले ऑस्ट्रेलियाने जिंकला, पण जागतीक क्रिकेटला त्यामुळे एक गती आली. वेळखाऊ कसोटी क्रिकेटला उबगलेले रसिक परत वनडेच्या गतीमानतेमुळे क्रिकेटकडे वळले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या २६ इतकी असून आजवर जवळ जवळ २५०० खेळाडू ५००० पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत. त्यातील केवळ सहा खेळाडूंनाच द्विशतके झळकवता आली आहेत. या सहा जणात ३ भारतीय, तसेच पाकीस्तान, विंडीज व न्युझिलंडच्या प्रत्येकी एकेका खेळाडूचा समावेश आहे. भारताच्या रोहित शर्माने काढलेल्या २६४ धावा या वनडे क्रिकेटमधीळ वैयक्तीक सर्वोच्य धावा आहेत. रोहितने सर्वाधीक ३ द्विशतकेही आपल्या नावे केली आहेत. विंडीजचा ख्रीस गेल विश्वचषकात द्विशतक करणारा पहिला खेळाडू होय. सन २०१५ च्या विश्वचषकात २ द्विशतके निघालीत. हेच विश्वचषकातील दोन द्विशतके आहेत. सन २०१० पर्यंत पहिल्या द्विशतकाची नोंद झाली नव्हती. क्रिकेटचा देव म्हणून गणल्या जात असलेल्या सचिन रमेश तेंडुलकर याने जगातलं पुरुष एक दिवशीय क्रिकेटमधील पहिलं द्विशतक नोंदविलं.सन २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना बरोबर २०० धावा करून एक ऐतिहासीक असा मैलाचा दगड गाठला. भारताच्याच विरेंद्र सेहवागने विंडीज विरुध्द सन २०११ मध्ये २१९ धावा करुन जगातलं दुसरं द्विशतक फटकावलं. सन २०१३ मध्ये रोहीत शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद २०८ धावा करून वैयक्तिक स्वतःचं पहिलं व एकूण तिसरं द्विशतक नोंदवलं. नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना २६४ धावा फटकावून रोहित शर्माने वैयक्तीक व जागतीक विक्रमी सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. हे रोहीतचं दुसरं द्विशतक होतं. पाचवं आणि सहावं द्विशतके सन २०१५ च्या विश्वचषकात नोंदले. झिंबाब्वे बरोबर ख्रिस गेलने २१५ धावा फटकावल्या. तर त्यानंतरच्याच सामन्यात न्युझिलंडच्या मार्टीन गुप्टिलने विंडीजविरुद्धच खेळून नाबाद २३७ धावा ठोकल्या. या धावा आजवरच्या विश्वचषक स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्य धावा आहेत. एकूणातलं सातवं द्विशतक ठोकण्याचा मान भारताच्या रोहित शर्माला मिळाला. रोहितने सन २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा करून स्वतःचं तिसरं द्विशतक नोंदवलं. नुकतंच २० जुलै २०१८ रोजी पाकीस्तानच्या फखर झमन याने झिंबाब्वे विरूध्द खेळताना २१० धावा फटकावल्या. अशा प्रकारे तो वन डेतील सहावा द्विशतकवीर ठरला. सर्वात लक्षवेधक बाब अशी की, हे सहाही द्विशतकवीर सलामीचे फलंदाज आहेत. यातील सचिन व सेहवाग सोडल्यास बाकीचे चार जण अजूनही खेळत आहेत व त्यांना आपली द्विशतकांची संख्या वाढविण्याची संधी उपलब्ध आहे.
लेखक : - दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत
.Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.