अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयातील स्नेह संमेलन दरवर्षी श्रीमंत प्रतापशेठजी यांची पुण्यतिथी व मातृ हृदयी साने गुरुजी यांची जयंती या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून आयोजित करण्यात येते . यावर्षी सुद्धा स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यासाठी महाविद्यालयाने जय्यत तयारी केली आहे. स्नेह संमेलनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हा असतो त्यासाठी महाविद्यालयांत विविध समित्यांचे काम वेगात सुरू आहे.यामध्ये रंगमंच व साऊंड सिस्टीम, विविध मनोरंजन, नाट्य एकांकिका, शेला पागोटे, शिस्त, फॅन्सी ड्रेस व विविध स्पर्धा, निबंध वक्तृत्व कथाकथन, बैठक व्यवस्था, रांगोळी केशरचना मेहंदी स्पर्धा, आनंद मेळावा व रेकॉर्ड भेट, क्रिडा, पाककला स्वीट डिश सलाद स्पर्धा,काव्य वाचन,पारीतोषक व प्रमाणपत्र वितरण ,फाईन आर्टस गॅलरी आणि प्रसिद्धी समिती इत्यादी समित्यांचा समावेश आहे.
स्नेह संमेलनाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे
दिनांक २४ डिसेंबर ला सकाळी १०.३० वाजता धवजारोहन होऊन स्नेहसंमेलनाच्या उदघाटन समारंभाला सुरुवात होईल. उदघादन समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष मा. प्रदीप कुंदनलाल अग्रवाल तर उदघाटक म्हणून डॉ सौ राखी प्रशांत जाधव स्त्रीरोग तज्ज्ञ कल्याण आणि प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जनता सहकारी बँकचे माजी अध्यक्ष श्री संजय चंपालाल बिर्ला उपस्थित राहणार आहेत याशिवाय विशेष अतिथी म्हणून आमदार अनिलदादा पाटील ,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.यावेळी व्यासपीठावर खा शि मंडळाचे सर्व मा. संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित असतील.
उदघादन समारंभाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या ललित कलागुणांच्या आविष्काराचे प्रदर्शन असणाऱ्या फाईन आर्ट गॅलरीचे उदघाटन होईल यासोबतच विद्यार्थ्यांसाठी गाण्याची धमाल रेकॉर्ड भेट होईल.दुपारी २ वाजता आॅकेस्टा् ,गीत गायन, नृत्य, मिमीक्री यांचा समावेश असलेले विविध मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतील.
दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा तसेच नाटीका व एकपात्री प्रयोग विद्यार्थी सादर करतील. संध्याकाळी ५ वाजता चला हवा येऊ द्या फेम कॉमेडी शो अभिनेता ज्युनिअर मंकरद अनासपुरे हा कार्यक्रम सादर होईल यानंतर ६ वाजता असणं..... नसणं ही पुरुषोत्तम करंडक एकांकिका प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी सादर करतील.
दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बक्षिस वितरण, शेला पागोटे आणि समारोप समारंभ कार्यक्रम सुरू होईल.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा शि मंडळाचे कार्योपाध्यक्ष मा.संदेश बिपिन गुजराथी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सौ गौरी शुक्ल रानडे प्रख्यात डॉक्टर पुणे तसेच प्रा डॉ श्याम साळुंखे शेंदुर्णी महाविद्यालय , आणि विशेष अतिथी म्हणून मा. श्रीमती स्मिताताई उदय वाघ आमदार विधानपरिषद व माजी आमदार मा शिरीषदादा चौधरी उपस्थित राहणार आहेत.
स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी प्राचार्या, उपप्राचार्य ,सर्व समिती प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परीश्रम घेत आहे या सर्वांना खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष तसेच सर्व व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शन लाभत आहे. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्या डॉ ज्योती एस राणे, स्नेह संमेलन प्रमुख प्रा ललिता पाटील, प्रा आर एम पारधी, सचिव प्रा डॉ ए बी जैन तसेच खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष आणि संचालक मंडळाने केले आहे
प्रसिध्दी समिती प्रमुख
*प्रा डॉ विजय मांटे* 8275028441
*प्रा किरण पाटील* 9860459091*
