बोरघर / माणगांव(विश्वास गायकवाड ) माणगांव तालुका भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची दि. २० डिसेंबर रोजी बिनविरोध फेर निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांनी काम केले. ही तालुक्याची संघटनातमक निवडणूक होती.या निवडणूकीसाठी तालुका अध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज संजय ढवले यांचा असल्याने निवडणूक अधिकारी रमेश मुंढे यांनी संजय ढवळे यांची भाजपच्या माणगांव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्या चे घोषित केले. यावेळी संजय ढवळे यांना सुचक म्हणून सुरेंद्र साळी यांनी पाठिंबा दिला.
या कार्यक्रमाच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे २०२० सालाचे दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. य कार्यक्रमासाठी समन्वय समिती अध्यक्ष नाना महाले ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग ,अँड. अनिकेत ठाकूर, चिनमय मोने ,माणगांव तालुका महिला मोर्चा अध्यक्षा यशोधरा गोडबोले ,बाळशेट घोणे ,योगेश जाधव ,योगेश सुळे ,राकेश पवार ,तसेच माणगांव तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
संजय ढवळे यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध सर्वानुमते निवड झाल्याने उपस्थित अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षपदाची निवडणूक ही तीन वर्षांनी होत असते. भाजपचे पदाधिकारी यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे कार्यकत्यानी मनोगतात व्यक्त केले. संजय ढवळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच जरी आपली सत्ता नसली तरी भाजप पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे करीत राहणारच .माणगांव तालुक्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम करणार. तसेच १९९५/९६ या साली भाजप मध्ये पक्ष प्रवेश करुन माणगांव पंचायत समिती निवडणूक लढवून १६५० मते मिळाली होती. माणगांव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना अनेक निराधार लोकांना योजनेचा लाभ मिळून दिला. भाजप पक्षाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला.हीच पोचपावती पक्षांनी मला दिली. असून यावेळी संजय ढवळे यांनी रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष तथा आ.प्रशांत ठाकूर व उपस्थित मान्यवर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
