अमळनेर - अमळनेर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सप्ताहाची कार्यशाळा अमळनेर येथील शिवाजी हायस्कूल येथे दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी तालुका अध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या कार्यशाळेत दिशा गॅस एजन्सी चे संचालक श्री दिनेशभाई रेजा यांनी सिलेंडर गॅस शेगडी गॅस सिलेंडर व इतर उपकरणंविषयी सविस्तर महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तसेच तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांनी घरगुती उपयोगात येणारी कोणतीही वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी व फसवणूक होत असेल तर काय उपाय योजना कराव्यात याची माहिती दिली त्याचप्रमाणे महिला आघाडी प्रमुख ॲड. भारती अग्रवाल यांनी कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण करावी याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायतीचे सचिव विजय शुक्ल, सूत्रसंचालन तालुका संघटक राजेंद्र सुतार व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक गोसावी सर यांनी केले. या कार्यक्रमास शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर पाटील, पर्यवेक्षक सुधाकर पाटील व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी वैधमापन विभागाचे गुलाब चौधरी, राजू पाटील हेही उपस्थित होते विजय शुक्ल यांनी वजन मापाविषयी यावेळी माहिती दिली. ऑनलाइन खरेदी कशी करावी त्यामध्ये कशाप्रकारे फसगत होऊ शकते याचे उदाहरणासहित दाखले जॉईंट सेक्रेटरी योगेश पाने यांनी दिली.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष मकसूदभाई बोहरी तालुका संघटक राजेंद्र सुतार सचिव विजय शुक्ल, सहसचिव योगेश पाने, महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट भारती अग्रवाल तसेच कार्यकारणी सदस्य खदिर सादिक, सतीश मुंडके, उर्जा मित्र सुनील वाघ तसेच कार्यकारणी सदस्य सौ वनश्री अमृतकार सौ अंजू ढवळे उपस्थित होत्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी वर्गाने सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला
