Halloween party ideas 2015


अमळनेर व चोपडा तालुक्यातील  वाळू तस्कारांना लगाम 
वाळू चोरी रोखण्यासाठी कलम 144 अंमल
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- सध्या अमळनेर तालुक्यात चोरटी वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याबाबत अनेक पर्यावरण प्रेमी संघटनांनी याबाबत आवाज उठवला होता .राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती भोई यांनीही अमळनेर तालुक्यातील वाळू माफीयांबद्दल आवाज उठवला होता.त्याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन झोपलेल्या प्रशासनला  जागे केले होते.
अमळनेर तालुक्याचा वाळू चोरी माफियांचा विषय  अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अधिवेशनामध्ये मांडून शासनाला लक्षात आणून दिले. 
वाळू चोरीवर  निर्बंध घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी अमळनेर चोपडा तालुक्यातील 50 गावांची नदीपात्रामध्ये 21 डिसेंबर 23 फेब्रुवारी 2020 दरम्यान बंदी घातली आहे. त्यासाठी कलम 144 लागू केले आहे या आदेशाची अंमलबजावणी अमळनेर तालुक्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 अमळनेर तालुक्यात सगळ्यात मोठी वाळूची सर्रास चोरी होती वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नव्हते. वरील आदेशाचे  जे उल्लंघ करतील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईच्या सूचना उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. खाजगी वाहन नदीपात्रात प्रवेश केल्यास ती जप्त केली जाणार आहेत.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.