गडखांब केंद्राची शिक्षण संवाद परीषद पातोंडा येथे उत्साहात संपन्न
दि.20/12/2019 रोजी गडखांब केंद्राची 'शिक्षण संवाद परिषद 'पातोंडा कन्या व दापोरी बु या दोन्ही शाळांच्या संयूक्त विद्यमाने जि.प.मुलींची शाळा पातोंडा ता.अमळनेर येथे ऊत्साहात संपन्न झाली .यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख दादासो.अरूण सोनू मोरे हे होते .नियोजनानुसार कार्यक्रम घेण्यात आले. कन्या शाळेच्या मुलींनी उत्कृष्ट परिपाठ सादर केला . ज्ञानरचनावादावर आधारित इ.४थी या वर्गाचा 'माझा जिल्हा माझे राज्य 'हा नमुना पाठ कैलास माळी यांनी घेतला .शैक्षणिक साहित्याचा वापर योग्य पद्धतीने करण्यात आला .कृतीतून अध्यापन ही संकल्पना सर्वांना आवडली. मुल्यवर्धन ही तासिका वैशाली लोखंडे यांनी घेतली .विविध उपक्रमात शिक्षकांना सहभागी करुन घेतले .संगिता सुर्यवंशी यांनी इंग्रजी अध्ययन पेटीतील साहित्याची ओळख करुन दिली .याकामी श्रध्दा पाटील यांचे सहकार्य लाभले .शिष्यवृती मार्गदर्शन सुनिल सोनवणे यांनी केले .शासकीय माहिती ,परिपत्रकवाचन,लाभाच्या योजना ,udise,शाळा सिध्दि,अध्ययन स्तर याबाबत सखोल मार्गदर्शन केंद्रप्रमुख अरूण मोरे यांनी केले .राजेंद्र बागुल,भानुदास माळी यांनी अनमोल सहकार्य केले .केंद्रातील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती .