सानेगुरुजी कन्या हायस्कुल अमळनेरच्या क्रिकेट संघाचे नाशिक विभागात यश
सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
आज नाशिक येथे झालेल्या विभागिय क्रिकेट स्पर्धेत आमच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलचा संघ 1ओव्हर व 9गडी राखून विजयी झाला व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे.साक्षी दिपक पाटील व अनन्या हेमंत जोशी यांनी नाबाद 60 धावांचे उद्दीष्ट पूर्ण करत शाळेस ही विजयश्री प्राप्त करून दिली. सर्व खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. विलास चौधरी सर, श्री.रविंद्र कोळी सर ,श्री. भरत सूर्यवंशी सर यांचे मुख्याध्यापिका श्रीमती.अनिता बोरसे ,सचिव श्री. संदीप
घोरपडे सर अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील,सहसचिव श्री. अशोक बाविस्कर यांनी अभिनंदन केले.