हवालदिल बळी राजाचे पुसले अश्रू
तालुक्यात शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष केली पाहणी
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे बळी राजा हवालदिल झाला असून त्यांची अश्रू पुसून दिलासा देण्यासाठी आमदार स्मिताताई वाघ यांनी सोमवारी तालुक्यातील अनेक खेड्यात शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना ही गहिवरून आले. अजीबात चिंता करू नका. राज्य सरकार तुमच्या पाठिशी खंबीर पणे उभे आहे, असा दिलासा दिला.
अमळनेर तालुक्यात परतीच्या पावसाने कहरच केला आहे. चार वर्षे कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जगन मुश्कील केले. तर यंदा ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडले आहे. निवडणूक आणि दिवाळीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास उशीर झाला. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आमदार स्मिताताई वाघ यांनी ग्रामिण भागात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यात ज्वारी, कापूस,मका अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून आमदार स्मिता वाघ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच जिल्हा कृषि अधिकारी,तालुका कृषि अधिकारी,तहसीलदार यांच्या समवेत चर्चा करुण तत्काळ सर्वच ठिकाणी पंचनामे करुन आवश्यक कार्यवाही करावी ह्या प्रकारच्या सूचना केल्या
