Halloween party ideas 2015


अमळनेर येथील पवन शिंपी याची ज्युडो स्टेट चॅम्पियनशिपमध्ये यशाची भरारी

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील प्रभाग पंधरा मधील नगरसेवक प्रताप शिंपी यांचा चिरंजीव पवन प्रताप शिंपी याने लातूर येथे नुकत्याच झालेल्या ज्युडो स्टेट चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करून ब्रांझ मेटल पटकविले, त्याच्या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 पवन शिंपिला कल्पविजय स्पोर्ट्स क्लबचे सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले .त्याची लातूर येथे झालेल्या स्टेटस चॅम्पियनशिपमध्ये निवड झाली होती या स्पर्धेत त्याने शेवटपर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना नामोहरण करीत यश संपादन केले. पवन याआधी कुस्ती व कराटे स्पर्धेत यश संपादन केले आहे.
पवन शिंपी यांने अमळनेर शहराचे नाव राज्यात गाजवले त्याबद्दल त्याचे अभिनंदन  शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, आमदार गुलाबराव पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे, नगरसेवक संजय कौतिक पाटील ,जीवन पवार, शिवसेनेचे नितीन निळे,
 मुन्ना शिंपी यांनी अभिनंदन केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.