Halloween party ideas 2015


सोशल मिडिया च्या माध्यमातून २५ वर्षानंतर एकत्र आले प्रतापियन्स

व्हाटस अप च्या माध्यमातून पदवी पुर्ण झाल्यानंतर सुमारे २५ वर्षानंतर प्रताप कॉलेज च्या विध्यार्थ्यान्नी अमळनेर च्या अंबिका मंगल कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यात ईंग्रजी,ईतिहास,भूगोल,मराठी ,हिंदी,या सर्व विषयाचे विद्यार्थी एकत्र आले होते.

अगोदर सर्वांनी आपला परिचय करुन दिला व आपापल्या क्षेत्रात सर्वांनी केलेली प्रगती व पारिवारिक परिचय करुन दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार सरांनी केले तसेच काही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले तसेच काही जणान्नी आपल्या कॉलेज जिवनातील आठवणीन्ना ऊजाळा दिला व महाविद्यालयीन जिवनातील गमती जमती सांगुन सर्वांचे मनोरंजन केले. 
त्यानंतर सर्वांनी सातपुड्यच्या पाटोड्यांचा आस्वाद.
त्यानंतर सर्वांनी प्रताप महाविद्यालयात जाऊन फोटो काढलेत व आपापल्या विभागाला भेट दिली. या प्रसंगी सर्वांचे मन भरुन आले होते. तेथुन सर्व जण आशिया खंडातील प्रसिद्ध प्रताप तत्वज्ञान केंद्राला भेट दिली तेथे माजी प्राचार्य एस आर चौधरी सरान्नी सर्वांना मार्गदर्शन केले व परत एकदा सर्वांचा क्लास घेतला. या प्रसंगी स्वतः चौधरी सरांचे मन भरुन आले होते व ते म्हणाले की मी पैशांपेक्षा जास्त ह्या अशा विद्यार्थ्याची संपत्ती जास्त कमविली आहे व याचाच मला गर्व आहे. 
त्यानंतर सर्वांनी जड अंतकरणाने तेथुन निरोप घेतला व परत महाविद्यालयात आले. तेथे सर्वाना ग्रूप फोटोची एक प्रतिमा भेट म्हणून व सदैव आठवण रहावी म्हणून भेट देण्यात आली. व निरोप समारंभ करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पडावा म्हणून रवि चौधरी,अरुण पाटील,महेंद्र पाटील,विरु शहा ,रवि चौधरी,जितु चौधरी,शेखर धनगर ,चेतना वाडकर ,रोहिणी देवकर ,मनीषा कोंकणे ,या सर्वांनी परिश्रम घेतले.

🙏

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.