अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये शाळेच्या पटांगणात नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अनिल महाजन यांनी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे फक्त वृक्ष लावून चालणार नाही तर त्याचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण करून वर्षभर त्या वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी दहा वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली त्यांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले. वृक्षारोपण शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एस. के. महाजन ,लिपिक एन जी देशमुख शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.