Halloween party ideas 2015


कळमसरे येथे नुतन बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी-नुकताच बाजार समितीचे सभापती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे खंदे समर्थक व विश्वासू प्रफुल्ल पवार यांचा सत्कार कळमसरे येथे उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी आयोजित केला होता. त्यावेळी
कळमसरे येथे भाजपाचे मा. जिल्हाअध्यक्ष  बापुसाहेब उदयजी वाघ , नवनियुक्त अमळनेर कुषीउत्पन्न बाजारसमितीचे सभापती बापुसो प्रफुल्ल पवार तसेच साक्रीचे मा .सरपंच भाऊसो महेंद्र बोरसे उपस्थित होते. कळमसरे गावात अमळनेर कुषीउत्पन्न बाजारसमितीचे नवनियुक्त सभापती  प्रफुल्ल पवार यांचा सत्कार प्राध्यापक एस बी महाजन सर,  आबासाहेब मुरलीधर चौधरी, बापुसो अरुण चौधरी, यांनी संपूर्ण गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन करण्यात आला,  तसेच भारतीय जनता पक्षाचे मा. जिल्हाअध्यक्ष  व आमचे नेते उदयजी वाघ यांचा सत्कार मा. ग्रामपंचायत सदस्य आबा कुंभार व  समाजप्रिय पंकज निकम यांनी केला. यावेळी साक्रीचे मा.सरपंच महेंद्र  बोरसे , आदरणीय  नानासाहेब प्रेमराज  महाजन , खानदेश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर आर महाजन (उपसरपंच कळमसरे) , भाऊसो दिपक अशोक चौधरी , कळमसरे  व परिसर विकास फौंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर गुरव, मा.सदस्य नानासो सुदाम चौधरी , सरपंच बबलू भाऊ पवार, प्राध्यापक देवेंद्र महाजन ,  आरोग्य दुत शिवाजी राजपूत ,डॉक्टर खोडे साहेब तसेच गावातील प्रतिस्थित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 कळमसरे येथील उपसरपंच महाजन यांनी मान्यवराचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.