हिरा उद्योग समूह आणि मारवड विकास मंचच्या कार्याची फलश्रुती,बंधारा भरल्याने जैतपिर येथे आनंदोत्सव
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील माळण नदीचे खोलीकरण व गाळ काढणे आदी काम सर्वात पहिले हिरा उद्योग समूहाच्या स्व खर्चातून व त्यानंतर मारवड विकास मंचच्या माध्यमातून झाल्यामुळें यंदाच्या पावसाळ्यात माळण नदी प्रवाहित झाली असून गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांच्या आशा उजळल्या आहेत.जैतपिर येथे आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी टाकलेला बंधारा भरल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रवाहित झालेल्या या नदीमुळे प्रामुख्याने डांगर बु, रणाईचे जानवे, वाघोदे ,खडके ,निसर्डी ,पिपळे ,अटाळे ,ढेकू ,गलवाडे ,जैतपिर ,गोवर्धन बोरगाव, मारवड आदी गावांचा शेती सिंचन व पिण्याच्या प्रश्न प्रश्न सुटणार आहे. मतदार संघातून जलयुक्त शिवार, हिरा उद्योग समूहाच्या स्व खर्चातून या कामाची सुरुवात झाल्यानंतर लोकसहभाग देखील मिळाला यातून नाला खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत,जैतपिर येथे आ शिरीष चौधरी यांनी बंधारा टाकल्याने या पावसाळ्यात हा बंधारा फुल झाला असून मोठा जलसाठा निर्माण झाला आहे.यामुळे ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला,जैतपिर सरपंच निलेश बागुल यांनी आ शिरीष चौधरीं यांच्या दूर दृष्टीमुळे आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेत सिंचनाचा प्रश्न सुटला असून आम्ही सदैव ऋणात राहू अशी भावना व्यक्त केली.यावेळी रवींद्र पाटील, अरुण पाटील, मुकेश राजपूत,धनराज बागुल, कोमल पाटील,सुभाष पाटील,पांडुरंग पाटील,गणेश निकुंभ यावेळी उपस्थित होते.