Halloween party ideas 2015


अंचळगाव तांडा जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी

अंचळगाव तांडा - येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र गणपत राठोड व शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांच्या हस्ते व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपशिक्षक धनराज देवरे यांनी याविषयीचे महत्व मुलांना पटवून सांगितले व झाडे जगविण्यासाठी मुलांना झाडं दत्तक देण्याबाबत ठरविण्यात आले .शिवणी ता .भडगाव येथील नर्सरी मधून मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी निम , कवट, बेल , रेन ट्री आदी झाडांची रोपे वनसंरक्षक आर .के .पिंजारी यांच्या ताब्यातून घेऊन आणली व ती शालेय परिसर व गावात लावण्यात आलीत.यावेळी आपल्या गावाचे भूषण व नूतन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ .संजीव पाटील यांनी जगविलेल्या झाडांबद्दल विध्यार्थीनां माहिती देत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश पाटील , योगेश परदेशी आणि विध्यार्थी मित्रांनी सहकार्य केले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.