अमळनेर प्रतिनिधी
आज उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे दर्शना पवार यांनी विद्यार्थीनिना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
मुलींसोबत बदलत्या वयातील जाण -भान या विषयावर सानेगुरूजी स्मारकाच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी गुजगोष्टी केल्या.
मुलींमधील वाढत्या वयातील शारीरिक मानसिक बदलांचा स्वीकार करत समजुन घेत मुलींनी निर्भय पणे जगायला शिकले पाहीजे....
स्वतःच्या शरीराबद्दलचा न्युनगंड मनात न ठेवता. ताठ मानेने जगा , शिका भरपूर आहार घ्या व्यायाम करा...
शरीराला सजवून जास्त सजवण्याचा , कुत्रिमरीत्या सुंदर दिसण्याचे जास्त प्रयत्न करू नका. स्वतःचे बौद्धिक सौंदर्य वाढवा. फसवल्या जाणार नाही याची काळजी घ्या. स्वतः आर्थिक सक्षम झाल्याशिवाय लग्न करू नका.
हे बोलत असतांना गर्भात मुली मारुन प्रश्न सुटणार नाही ज्या कारणाने गर्भपात केले गेले तु मुलांना वंशाचा दिवा व मुलीला परक्याचे धन समजण्याची मानसिकता बदलली पाहिजे तरच प्रश्न सुटेल*
नाव हे मुलगा किंवा मुलगी मुळे चालत नाही. तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमच्या कर्तृत्व-दार्तृत्व मुळे चालते. हे लक्षात घेतले पाहिजे.
सावित्रीबाई फुलेंचे नाव त्यांच्या कर्तृत्वा मुळे आजही चालते.
महीलांना दुय्यम समजण्याची मानसिकता बदला.त्यासाठी सर्वांनी कटीबद्ध रहा.त्यातुनच निरोगी परीवार उभे राहतील........
या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक एम.के.पाटील सर,श्री.जे.व्ही.महाले सर,राजेश ठाकरे,हर्षा पाटील, सारिका पाटील,व्ही.एस.पावरा,आर.एम.शिरसाठ,वैभव बागूल, मयूर पाटील आदी उपस्थित होते........