Halloween party ideas 2015



अमळनेर येथील सानेनगर भागातील बोरी नदीकाठालगत आणि नदीमधील बाभळीची झाडे झुडपे प्रचंड प्रमाणावर होती.नदी पात्राला जंगलाचे स्वरुप प्राप्त झालेले होते. नदीची अशी दुरावस्था सानेनगर भागातील रहिवाश्यांना पहायली जात नव्हती.  पावसाळयात नुकतीच बोरी नदी वाहत असल्याने स्थानिक नगरसेवक आंणि नागरीक यांनी बोरी नदीकाठावरील घाण व झाडे झुडपे काढण्याबाबत अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्य्क्ष सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांना विनंती केली.त्यानुसार  तात्काळ नगराध्यक्षाताईंनी नगरपरिषदेकडुन 2 जेसीबी,मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडुन 1 व अमळनेर तहसिलदार सौ.ज्योती देवरे मॅडम यांच्याकडुन 2 असे एकुण 5 JCB मशिन उपलब्ध करुन देवून नारळ वाढवून कामाची सुरुवात तहसिलदार मॅडम, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,  स्थानिक नगरसेवक संतोष (भूरा ) पाटिल*, महेश पाटील, राजेंद्र यादव, पत्रकार सौ.जयश्री दाभाडे मॅडम , रावसाहेब पहेलवान, विक्रांत बी. पाटील व शेकडो  नागरीक यांच्या उपस्थितीत केली गेली. माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी नदीपात्रात सानेनगर भागात साफ सफाई सुरु आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.