अमळनेर प्रतिनिधी
दि ३ आज जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी मुल्यवर्धन उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.
मूल्यशिक्षणाने होतो मनाचा विकास,
जीवनी असावा नवचैतन्याचा ध्यास,
परंपरा, संस्कारमूल्यांची धरा कास,
घडणार आता भारताचा नागरिक खास...
या उक्तीप्रमाणे शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या इयत्ता पाहिली ते इयत्ता चौथीच्या सर्व विदयार्थ्यांसाठी निर्मित मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तीकाच्या माध्यमातुन मुल्य शिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपक्रम पुस्तिका ही छान, सुंदर , सुबक व सचित्र असून इयत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक घटकाचे मुल्यशिक्षण देणारी आहे. विदयार्थ्यांना वैयक्तीक व सामाजिक स्वच्छतेपासुन तर जीवनाचे सर्व मुल्यांची ओळख करुन देणारी आहे.कृतीशिलतेला वाव देणारी आहे. मागच्या वर्षीही या विदयार्थी उपक्रम पुस्तिकेचा वापर करुन वर्षभर हा उपक्रम शाळेवर राबविण्यात आला. विदयार्थी रोज आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालुन नियमित व वेळेवर शाळेत आई वडीलांना नमस्कार करून येणे, साफसफाई व स्वच्छता राखणे, एकमेकांना अपशब्द न बोलणे, मुक्या प्राण्यांना अन्न टाकणे व दगड न मारणे, पक्षी मारण्याची गुलेर व गोफण बंद, झाडांचे रक्षण करणे, आज्ञाधारकपणा, आईला घरकामात लहानसाहान मदत, वृद्ध लोकांना मदत करणे, शिस्त पाळणे, गृहपाठ करणे असे अनेक सकारात्मक बदल विदयार्थ्यांमध्ये घडले. शाळेचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक तथा पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी या बाबत वर्षभर प्रयत्न करुन पुस्तिकेसाठी लागणारे पेन, पे'न्सिल, शॉपर्नर, खोडरबर, रंगपेटी, कात्री, रंगीत कागद व इतर साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करुन दिले.
यावेळी गुणवंतराव पाटील म्हणाले किशोर वयात व कॉलेजात विदयार्थांकडुन घडणाऱ्या ताज्या हिंसक घटना बघुन मुल्यशिक्षण ही काळाची गरज बनली आहे. मुल्य शिक्षणासाठी आठवडयाच्या वेळापत्रात काही तासिका राखिव जरी असल्या तरी मुल्यशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.विद्यार्थ्यांना प्रत्येक कृती, उपक्रम व पाठातुन मुल्यशिक्षण दिल पाहिजे. त्यांच्यातुन सुजाण व सुसंस्कृत नागरिक निर्माण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मूल्यवर्धन शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक मिर्झा तस्लीम बेग अस्लम बेग यांनी शाळेला भेट देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्या बदल शाळेचे कौतुक व अभिनंदन केले आहे.