अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील सुरतसिंग तमर यांचे
दुमजली घर अचानक कोसळल्याने बेघर झालेल्या प्रितम तवर यांच्यासह त्यांच्या पत्नीला या संकटातुन सावरण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.त्यापाठोपाठ महाराष्ट्र बँकेचे शाखा प्रबंधक रवींद्र कुलकर्णी यांनी आपल्या कर्मचारी वर्गाची सहविचार सभा घेऊन हा तवर कुढुंबीयांचे नुकसान झाल्याने कुढुंब उघडयावर आले आहे. संसाराच्या सर्व जीवन आवश्यक वस्तू दाबल्या गेल्या आहेत. आपण एक सामाजिक बांधीलकी म्हणून मदत करणे एक नैतिक जबाबदारी आहे. असे सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या सर्व कर्मचारी वर्गाने क्षणाचा विचार न करता होकार दिला.

संसारपयोगी वस्तू मातीमोल होऊन हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले,दोन वेळेच्या जेवणासाठी देखील त्यांना दुसऱ्याच आसरा घ्यावा लागत आहे.अश्या परिस्थितीत महाराष्ट्र बँकेचे शाखाव्यवस्थापक व कर्मचारी यांनी १५५००/ रूपये सुरतसिंग तवर व त्यांच्या परीवाराकडे सुपूर्त केले व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक रविंद्र कुलकर्णी,उपव्यवस्थापक मिलिंद वानखेडे ,सचिन कुमार,व्यवस्थापक कुमारी गुरूप्रित कौर, प्रकाश जैन, अविनाश कोतवाल, श्रीमती ज्योती पाठक, श्रीमती प्रियदर्शनी भोसले, नितीन पाठक, कलीम पिंजारी ,शशिकांत लांडगे ,निर्मल भामरे, सेवानिवृत्त कर्मचारी विजय धनगर ,पत्रकार ईश्वर महाजन उपस्थित होते.