अमळनेर(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी ग्रंथालय सेल च्या प्रदेश समन्वयक रिता भुपेंद्र बाविस्कर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिवपदी राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिवपदी निवड केली. त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, संचालक अनिल भाईदास पाटील जि प सदस्य जयश्री पाटील, शिवाजी पाटील,सुरेश पतील व तालुकाध्यक्ष सचिन पाटील,महिला तालुका अध्यक्ष योजना पाटील राष्ट्रवादी ग्रंथालय सेल चे राज्याध्यक्ष उमेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.गेल्या वर्षभरापासून पक्ष कार्यासाठी त्यांनी विविध भागात दौरे करून पक्ष संघटन मजबूत केले आहे त्यामुळे त्यांची या पदावर वर्णी लागली आहे.
यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.