Halloween party ideas 2015

फार्मसी महाविद्यालयाची उत्तम शैक्षणिक कामगिरी वर्ष २०१८-१९   
अमळनेर  प्रतिनिधी
          अमळनेर येथील खा.शि. मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी महाविद्यालयास, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी झालेल्या शैक्षणिक कामगिरीच्या सर्वेक्षणात "उत्तम" ग्रेड मिळाली आहे.                 
 या सर्वेक्षणात महाविद्यालयाचे प्राचार्य,  प्राध्यापक यांची शैक्षणिक गुणवत्ता , विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, अंतर्गत परीक्षा व त्यांचा दर्जा,  विद्यार्थ्यांसाठी सुविधा इत्यादींचे मुल्यांकन करण्यात आले.     महाविद्यालयाच्या या कामगिरी बद्दल शैक्षणिक  वर्ष २०१८-१९ चे खा.शि.मंडळचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन व फार्मसी कॉलेजचे  चेअरमन योगेश मुंदडे, सदस्य डॉ.  बी. एस.  पाटील,   डॉ.संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल, कल्याण पाटील व सेक्रेटरी डॉ.अरुण जैन यांनी प्राचार्य प्रा. रविंद्र गंगाराम माळी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी  व सर्व  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.