अँड अशोक मोरे यांच्यातर्फे पू सानेगुरुजी ग्रंथालयाला 5 हजार रुपये देणगी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे वकिली व्यवसाय करणारे अँड अशोक मोरे यांनी वडिल कालकथित रामभाऊ दशरथ मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुस्तकांसाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला पाच हजार रुपये देणगी दिली.
यावेळी अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रकाश वाघ व्यासपीठावर उपस्थित होते।
येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयातर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते याची माहिती मिळाली खूप चांगला उपक्रम वाचनालाया तर्फे राबविण्यात येत आहे अनेक तरुण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊन यशस्वी होत आहेत व होत राहतील त्यामुळे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी छोटीशी भेट देत आहे अश्या शब्दांत . अँड मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचनालयाला पुस्तक खरेदीसाठी पाच हजार रुपये भेट देऊन श्री मोरे यांनी खऱ्या अर्थाने फादर्स डे साजरा केला आहे. आपल्या देणगीतुन जी पुस्तके खरेदी केली जातील त्यातून प्रेरणा घेऊन याठिकाणी अनेक तरुण भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतील असे प्रतिपादन अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले, चिटणीस श्री प्रकाश वाघ म्हणाले की आपण दिलेली भेट आमच्यासाठी व तरुणांच्या प्रगतीसाठी खूप अनमोल आहे त्याबद्दल वाचनालय आपले सदैव आभारी राहील.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या खास शैलीत सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले प्रशस्तीपत्र श्री मोरे यांना प्रदान करण्यात आले. वाचनालयाचे संचालक बापू नागावकर,गंभीरराव जाधव,दीपक वाल्हे तसेच शिरसाळे येथील आदर्श शिक्षिका श्रीमती मनीषा चौधरी ,गोविंद चौधरी, सबगव्हानचे सरपंच नरेंद्र पाटील ग्रामसेवक नितीन मराठे,सोपान भवरे तसेच वाचक व कर्मचारी वर्ग याप्रसंगी उपस्थित होते सूत्रसंचलन विजयसिंग पवार यांनी केले
फोटो