अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राप्रमाणे वाढीव अनुदान द्या -विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचे अनिल पाटील व कार्यकर्त्यांचे निवेदन.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राप्रमाणे मिळावे यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शेतकर्यांना कापूस बोंडअळी अनुदान बागायती क्षेत्राप्रमाणे 13500 मिळावे तसेच आठही महसूल मंडळांना सन 2018-19 पिक विम्याचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक श्री अनिल भाईदास पाटील यांनी विधानपरिदषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते मा.अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, काँग्रेसचे नेते प्रा सुभाष सुकलाल पाटील, तालुकाउपाध्यक्ष हिंमत पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील उपस्थित होते.