शिंदे माध्यमिक विदयालयात सिकलसेल तपासणी .
शिंदे माध्यमिक विद्यालयात सिकलसेल तपासणी संपन्न
पाचोरा प्रतिनिधी -येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै पि के शिंदे माध्यमिक विद्यालयात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पाचोरा ग्रामीण रुग्णालयामार्फत सिकलसेल तपासणी अभियान राबविण्यात आले प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची सिकलसेल निदानासाठी रक्त तपासणी करण्यात आली सिकलसेल हा आजार अनुवंशिक असून त्यावर उपचार व मार्गदर्शनाने हा आजार निश्चित बरा होतो असे आरोग्य विभागामार्फत उपस्थित असलेल्या विद्या जाधव अजय चव्हाण अतुल पाटील यांनी सांगितले. विद्यालयातून मुख्याध्यापक एस व्ही गीते सर आरोग्य समितीचे श्रीकांत नागणे श्रीमती वि पी भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते