Halloween party ideas 2015

पुणे येथे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू  विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात 'विद्यार्थी सहायक समिती'चे वसतिगृह प्रवेश अर्ज उपलब्ध.....

पुणे प्रतिनिधी

 दरवर्षी पुणे येथे राज्याच्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेण्यासाठी गरीब,गरजू व हुशार विद्यार्थी येत असतात. अशा विद्यार्थ्यांना अल्पदरात वर्षभर निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी,विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी डॉ.अच्युतराव आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 1955 साली 'विदयार्थी सहायक समिती,पुणे'या संस्थेची स्थापना करण्यात आली.समता,स्वच्छता, स्वावलंबन या त्रिसूत्रीवर संस्थेचा विश्वास असून देशासाठी जबाबदार नागरिक घडवणे यासाठी संस्थेचे अखंड प्रयत्न चालू आहेत.

       सदर समितीमार्फत एकूण चार वसतिगृह चालवले जातात.त्यापैकी दोन वसतिगृह मुलींचे व दोन वसतिगृह मुलांचे आहेत.सर्व वसतिगृहात एकूण प्रवेशक्षमता 750 विद्यार्थी असून शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज अशी ही वसतिगृहे आहेत.सदर वसतिगृह कुठलेही शासकीय अनुदान घेत नाही.दानशूर नागरिक,देणगीदार यांच्या देणगीतून मिळालेल्या रकमेत व विद्यार्थ्यांकडून आकारलेल्या अल्प फी मधून मिळालेल्या रकमेत वसतीगृहाचा खर्च भागवला जातो.दोन्ही वेळचे जेवण,नाश्ता, चहा यासह निवासाची सोय वसतिगृहात असते. शिवाय चोवीस तास लाईट,गरम पाणी,सिक्युरिटी ची सोय असून ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब व गरजू अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यानां वसतिगृहात प्रवेश दिला जातो. आजअखेर असंख्य विद्यार्थ्यांनी संस्थेच्या या वसतिगृहात राहून उच्च शिक्षण घेतलेले आहे.व अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.गरीब व गरजू असणाऱ्या,पुण्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत जोडलेला अर्ज वाचून,प्रिंट काढावी.सर्व माहिती स्वहस्ताक्षरात भरून आवश्यक ते कागदपत्र जोडून अर्ज कार्यलयीन वेळेत जमा करावा असे युवक मित्र परीवाराचे अध्यक्ष प्रविण महाजन(पुणे) यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.