पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघटने कडून तीव्र निषेध
अमळनेर प्रतिनिधी,
अमळनेर , पत्रकार संघटने कडून जळगाव येथील पत्रकार संतोष ढिवरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले निवेदन ,
जळगाव येथील एकास डांबून मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या घटनेची विचारपूस व बातमी घेण्यासाठी घटनास्थळावर गेलेले जळगाव येथील पत्रकार संतोष ढिवरे यांना शहरातील करिष्मा हॉटेलचे मालक व तेथील दहा-बारा गुंड प्रवृत्तीच्या वेटर लोकांनी जबर मारहाण करून प्राण घातक हल्ला केला. त्यात त्यांना मार लागला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल आहेत. बातमीसाठी गेलेला हा पत्रकार वारंवार पत्रकार असल्याचे सांगत होता तरीदेखील तेथील दहा -बारा लोक जबर मारहाण करीत होते.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे दिनांक 20 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दिनांक 20 जून 2019 रोजी दुपारी घडली असून दिवसाढवळ्या पत्रकारांवर असा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला असल्या कारणाने आम्ही पत्रकार बांधव या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत. या घटनेतील आरोपीना तात्काळ अटकेसह दोषींवर कडक कारवाई करावी व भविष्यात असे प्रकार होणार नाही या आशयाची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी संजय पाटील, वसंतराव पाटील, चंद्रकांत काटे, जयवन्तलाल वानखेडे, प्रा विजय गाढे, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, जितेंद्र पाटील, गौतम बिर्हाडे, योगेश कापडने, सजय मरसाळे, सुरेश कांबळे, कमलेश वानखेडे, अधिकार बोरसे, विवेक पाटील, अजय भामरे. शामकांत पाटील, हृदयनाथ मोरे, सुखदेव ठाकूर, गणेश चव्हाण, सत्तार खान, अरुण पवार आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.