*पवित्र नात्याला जात नसते*_
*भाऊबीज हा पवित्र नात्याचा सण-अँड तिलोत्तमा पाटील.*
*बहिणीला भाऊबीज सणाला भावाकडून रोप भेट.*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
.अमळनेर येथिल सामाजिक कार्यकरत्या अॅड़ तिलोत्तमा पाटील यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.वेगवेगळ्या समाजबांधवांच्या ताईं मानस बहीण आहेत गणेश चौधरी व तुळशीराम गिलड़ा .नंदु चिकाटे. हे न चुकता प्रत्येक भाऊबीज व रक्षाबंधनाला ताईकड़े जातात व ओवाळून घेतात पन यावेळी ताईसह काॅलनीतील इतर भाऊबहीनीनीही वेगळ्या प्रकारे भाऊबीज साजरी करायच ठरवल आणि प्रत्येक भावाने बहीणीला ओवाळणी म्हणून पर्यावर्णाचा विचार करून एक छोटे रोप दिले एवढेच नव्हे तर ह्या दिवसाची सतत आठवण रहावी महणून सर्व भाऊबहीणीनी मिळुन लगेच प्लाॅट एरियात वृक्षारोपणही केले.
अँड तिलोत्तमा पाटील म्हणाल्या कि भाऊबीज हा बहीण व भावाचा पवित्र सण आहे. त्याला जात नसते.त्याचे पावित्र्य जोपले पाहिजे. सध्या सोशलमिडीयामुळे कमी वयात मुला व मुलीच्या हातात मोबाईल असल्याने त्या नातेसंबंधात गालबोट लागत आहे. ते नातेसंबंध जपले पाहीजे असे अँड तिलोत्तमा पाटील बोलत होत्या.
यावेळी अॅड़ तिलोत्तमा पाटील .गणेश चौधरी.रोहीत देशमुख _आदिती देशमुख सुनिता पाटील_मनोज सोनार.ऊत्कर्षा पाटील _हर्षल पाटील नेहा चौधरी _मनिष चौधरी आदि बहीण भावांच्या जोड़ीने वृक्षारोपण केले.यावेळी प्रविण पाटील निखिल पाटील निलीमा महाले नंदु चिकाटे आदी ऊपस्थीत होते.
फोटो
वृक्षारोपण करतांना अँड तिलोत्तमा पाटील, गणेश चौधरी.
छाया ईश्वर महाजन अमळनेर.