Halloween party ideas 2015

*_बलिप्रतिपदा दि.८ नोव्हेंबर_*
*"भव्य बळीराजा मिरवणूक"*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
*_इडा पिडा टळो। बळीचे राज्य येवो।_*

अमळनेर बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदे निमित्त महात्मा बळीराजा  मिरवणूकीचे परंपरेनुसार आयोजन करण्यात आले आहे.
           _*मागिल १० वर्षांपासून सलग बळीराजा मिरवणूकीचे आयोजन अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा एक वैशिष्ट्य भाग  झालेला आहे.*_
    *बळीराजा मिरवणूक*  
अमलनेरच्या शिरुडनाका परिसरातून सकाळी ९ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरवात होईल.
मार्ग-वड चौक,झामीचौक परिसर,त्रिकोणी बाग परिसर ,पाचपाऊली देवी मंदिर परिसर ,बसस्टँड,धुळे रोड, विश्राम गृह मार्गे महात्मा बळीराजा स्मारक स्थळ येथे लोकजागर मिरवणूकीचा समारोप होईल.
*बळीराजा पूजन*
        यावेळी उपस्थित बळीराजा लोकोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधिंच्या व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महात्मा बळीराजा यांच्या शिल्पप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येईल.
             *बळीराजा मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!..*   

              बळीराजा मिरवणुकीत मोठ्यासंख्येने सर्व नागरीकांनी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते पदाधिकारी,सेवाभावी व्यक्तींनी सहभागी व्हावे हि विनंती......!
✨✨✨🙏🏻✨✨✨
*महात्मा बळीराजा लोकोत्सव समिती.अमळनेर*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.