Halloween party ideas 2015

माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटीलांनी पत्रकारांना दिली दिवाळी भेट.
अमळनेरला पत्रकार भवन लवकरच
माजीआमदार साहेबराव पाटील.
पत्रकारांनी मानले माजी आमदार साहेबराव पाटील, व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक यांचे आभार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
         अमळनेर शहरात आपल्या पत्रकार संघटनेचे एक पत्रकार भवन उभे राहावे अशी आपल्या सर्वांची मनस्वी इच्छा होती,,यासाठी दरम्यानच्या काळात अनेकदा प्रयत्न देखील झाले,,लोकप्रतींनिधींनी आश्वासन देखील दिले,,परंतु काही अडचणीमुळे हे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकले नाही,,अखेर आपली संघटना व पत्रकार बांधव यांच्याशी सतत व मनापासून ऋनानुबंध ठेवणारे कृषिभूषण साहेबराव दादांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वेगाने हालचाली केल्या आणि शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालायजवळील न प मालकीचा भव्य खुला भूखंड आपल्या संघटनेला पत्रकार भवनांसाठी देण्याचे निश्चित करून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव देखील करून घेतला,,दीपावली निमित्त लक्ष्मी पूजनच्या दिवशीच आपल्याला सरप्राईज भेट द्यावी हि त्यांची मनस्वी इच्छा असल्याने त्यांनी आपल्या पातळीवर वेगाने हालचाली करून कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतल्या.आणि काल सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अध्यक्ष व सचिव या नात्याने आम्हाला काहीही न सांगता अचानक बोलविले व थेट भूखंडाच्या ठरावाची प्रतच आमच्या हातात ठेवली,,,अचानक धनलाभ व्हावा असाच तो प्रसंग होता,दादांचे आभार कसे मानावेत हे देखील सुचत नव्हते,,,तरी अंतर्मनाने आभार मानून ते पत्र स्वीकारले,,,दादांनी देखील लवकर या जागेवर भव्य पत्रकार भवन उभे करून आपले स्वप्न पूर्णत्वास आणा अश्या मनस्वी शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी अजून काही मदत लागल्यास ती देण्याची देखील तयारी दर्शविली आहे.
          अश्या कर्तृत्ववान व दातृत्ववान आदरणीय दादांचे आपल्या संघटनेच्या वतीने खूप खूप मनस्वी आभार.आपण लवकरच आपली बैठक घेऊन सर्वांच्या साक्षीने दादासाहेब आणि नगराध्यक्षा ताईसाहेब यांचा सत्कार करून पुढील रणनीती ठरविणार आहोत.तरी देखील आपले कोणीही सदस्य दादांना भेटल्यास वैयक्तिक पातळीवर त्यांचे आभार नक्की मानावेत जेणेकरून या कर्तृत्वाचे त्यांना समाधान मिळेल असे पत्रकार बांधवानी बोलून दाखवले.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चेतन राजपूत व सचीव चंद्रकांत पाटील व पत्रकार बांधवानी माजीआमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले.
फोटो
माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.