सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन यांच्या वतीने आजपासुन प्रेरणादीप व्याख्यानमाला.
शिक्षणप्रेमीनी लाभ घेण्याचे आवाहन.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर येथे सानेगुरुजी शैक्षणीक विचार मंच व शिवशाही फाऊंडेशनच्या वतीने उदया दिनांक शनिवार दिनांक १०/११/२०१८ वार शनिवार पासुन प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तरी अमळनेर तालुक्यातील शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.
दिनांक १०/११/२०१८ वार शनिवारी संध्याकाळी संदीपकुमार साळुंखे(अप्पर आयुक्त औरंगाबाद) यांचे शैक्षणिक सामाजिक चळवळ काळाजी गरज या विषयावर आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तर प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील राहणार आहेत.तर दिनांक ११/११/२०१८ वार रविवारी संध्याकाळी सुदाम महाजन(तहसीलदार शिंदखेडा) करीयरच्या वाटा निवडतांना या विषयावर आहे.व्याख्यानमालेला अध्यक्ष प्रदीप अग्रवाल(चेअरमन-जी एस.हायस्कूल अमळनेर) प्रमुख अतिथी सौ हर्षदा पाटील(लोकनियुक्त सरपंच मंगरूळ) दिनांक १२/११/२०१८ वार सोमवारी प्रा जयदीप पाटील (अध्यक्ष-नोबेल फाऊंडेशन जळगाव)यांचे मुलांचे शिल्पकार आई,बाबा,आणि गुरुजी या विषयावर आहे.तर व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी निरज आग्रवाल (कार्याध्यक्ष खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर) तर प्रमुख अतिथी जयेशकुमार काटे(अध्यक्ष-शिवशाही फाऊंडेशन अमळनेर) आहेत. सदर व्याख्यानमालेचे पहीले वर्षे आहे.व्याख्यानमाला संध्याकाळी ६-३० वाजेला आय.एम.ए.हाँल जी.एस.हायस्कूल अमळनेर येथे आहे. तरी शिक्षणप्रेमी यांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.