प्रभाग चौदामध्ये युवा कार्यकर्ता रविंद्र पाटील यांनी नगरपालिका कर्मचारी यांना मिठाईचे वाटप.
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
| प्रभाग चौदामधील नगरसेविका श्रीमती कमलबाई पाटील व युवा कार्यकर्ता रवींद्र पाटील नगरपालीकेतील कर्मचाऱ्यांना मिठाई देतांना मुकादम गाजरे व कर्मचारी छाया ईश्वर महाजन अमळनेर |
-सध्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट आहे.यावर्षी वरूणराजा रूसल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे.अशातच प्रभाग चौदामध्ये नगरसेविका कमलबाई पिंताबर पाटील व युवा कार्यकर्ते रविंद्र पिंताबर पाटील यांनी यावर्षी दिवाळी आपल्या प्रभाग चौदामध्ये नगरपालीकेच्या कर्मचारी यांच्याबरोबर साजरी केली.त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
आपण समाजाचे एक देणे लागतो.या भावनेतून युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील गेल्या काही वर्षापासून सामाजिक बांधीलकी जोपासतांना दिसत आहे. प्रभाग चौदामध्ये नागरिकांची कोणती समस्या असो लागलीच सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असतात. प्रभाग चौदामध्ये नगरपालीकेचे कर्मचारी वर्षभर प्रमाणिकपणे काम करतात. त्यांना दिवाळीचे फराळ घरी बोलवून वाटपाचे काम नुकतेच रविंद्र पाटील यांनी आपल्या खिशातील पैशातून केले.त्यांच्या या उपक्रमांचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी कौतुक केले.
प्रभाग चौदामध्ये नगरसेविका कमलबाई पिंताबर पाटील, व युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी कामगारांना आपल्या घरी बोलवून दिवाळीचा मिठाईचे वाटप केला.यावेळी मुकरदम गोपाल गजरे व
गटार कामगार राजेंद्र संदानशिव, प्रमोद संदानशिव, अशोक संदानशिव, अरूणा संदानशिव, मधु बि-हाडे,राकेश बिर्हाळे, वंदना बैसाणे,वा झाडु कामगार अनिल कव्यागी,सुकलाल भुरट,नरेश जाधव, विजू फत्तेरोड,दुर्गा फत्तेरोड, कुंदन तेजी यांना फराळ वाटला.
याबाबत प्रभाग चौदामधील नगरसेविका कमलबाई पाटील व रविंद्र पाटील यांच्या या दिवाळी फराळ भेटीचे मनापासून आभार मानले.